नमस्कार,
२४ सप्टेंबर २०१० रोजी अयोध्येतील वादग्रस्त प्रकरणाचा निकाल न्यायालय देणार आहे.
लोकांनी या प्रसंगी कुठल्याही संभाव्य चिथावणीच्या अथवा कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊ नये आणि शांतता, कायदा आणि सुव्यवस्था पाळावी असे आवाहन महाराष्ट्राचा गृहमंत्री या नात्याने मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला या निमित्ताने करतो आहे.
माझे पोलिसदल तुमच्या सोबत आहेच आणि या प्रसंगी त्यांच्या संपूर्ण सहकार्याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यास आपण मला व माझ्या पोलिसदलाला कृपया सहकार्य करा.
धन्यवाद आणि आपणास माझे प्रेम,
जय महाराष्ट्र !!
आर.आर.पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.