मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …

सुप्रभात,

जेम्स लेन यांच्या ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या संदर्भात माझी मते ठाम आहेत. काल एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रात जेम्स लेन यांच्या पुस्तकावर घातलेल्या बंदीसंदर्भात मी घेतलेला पुढाकार आणि त्याच वेळी माझ्या ब्लॉग वर मी माझ्या लोकशाही प्रेमाविषयी व्यक्त केलेला विचार हे परस्परविरोधी असल्याचे मत एका पत्रकाराने व्यक्त केले आहे. मी लोकशाही प्रेमी असल्याने मला त्यांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे.

त्यांच्या मताबद्दल आदर व्यक्त करून आणि माझे मत अबाधित ठेऊन मी नम्रपणे नमुद करू इच्छितो की “लोकशाही म्हणजे अराजक नव्हे”. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. तिचे मत हे अंतिम असते आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या या मताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जवळजवळ एकमताने या पुस्तकावर बंदी घालण्याचे मत व्यक्त केलेले आहे.

महाराजांविषयी अनुदगार काढणार्‍या त्या पुस्तकातील ‘ती वाक्ये’ पूर्णपणे संदर्भरहित व सांगोवांगीच्या गप्पांतून आली आहेत. ते इतिहास संशोधन अजिबात नव्हे तर ती एक विकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाने स्वतः छत्रपतींना  ‘स्वातंत्र्याची प्रतिमा’ या रुपात पाहून महाराजांवर एक कविता लिहिली होती. (जिचे ‘जयतु शिवाजी’ हे मराठी भाषांतर स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांनी केले आहे.) शिवाय जे महापुरुष आज  हयात नसल्याने आपल्या बाजूने खुलासा करू शकत नाहीत त्या महापुरुषांची बेधडक सांगोवांगीच्या गप्पांतून बदनामी करणं हे लोकशाही विरोधी आहे व ही लोकशाहीतील एक विकृती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगातली  कोणतीही  लोकशाही आणि त्यातून येणारे स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाही. ‘Statue of  Liberty’  ज्या अमेरिकेत आहे तिथे सुद्धा हे स्वातंत्र्य अनिर्बंध उपभोगता येत नाही. तिथेही जगताना अनेक निर्बंध आहेत. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या एकमताने आणि जनतेच्या संपूर्ण पाठिंब्याने या पुस्तकावर बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ही बंदी घालण्यासाठी मी पुढाकार घेतला याचा मला नितांत अभिमान वाटतो, वाटणार आणि वाटत राहील याची नोंद कृपया त्या ‘राष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने’ आणि इतर सर्व लोकशाही प्रेमी नागरिक आणि माध्यमांनी घ्यावी ही नम्र विनंती.

माझ्या सर्व वाचकांना नमस्कार आणि प्रेम,
आबा

This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

4 Responses to मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …

 1. psanjayr2006 says:

  आबा अवघ्या महाराष्ट्रजनांच्या वतीने तूमचे त्रिवार अभिनंदन.तूमच्या ह्या निर्णयामुळे जगातील कोणतीच लेखणी महारांजाच्या विषयी अभद्र शब्द कागदावर उतरवू शकणार नाही.तूमचे असे निर्णय हेच आमचा आधार आहेत व अशा प्रत्येक वेळी अवघा महाराष्ट्र तूमच्या पाठीशी असेल. माहारजांविषयी प्रेम महाराष्ट्रजनांच्या रक्तात भिनलेलं आहे तेव्हा त्यांच्याविषयी अनुदगार महाराष्ट्र खपवून घेणार नाही. आबा पून्हा एकदा तुमचे अभिनंदन.

 2. amolsuroshe says:

  प्रिया आबा,

  सर्व प्रथम आपण सामान्य माणसांसोबत संवाद साधण्यासाठी हा ब्लॉग चा पर्याय निवडला त्या बद्दल आबा तुमचे आभार आणि अभिनंदन देखील, प्रखर आणि उत्तम वैचारिक वारसा लाभलेल्या या महाराष्ट्र सारख्या राज्यात हा नवा पायंडा आपण पाडला खरच हि काळाची गरज होती.

  जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदीचा निर्णय हा योग्यच होता, लोकशाही म्हणजे लोकांच्या मताची कदर करणे, आणि तमाम महाराष्ट्रीय नव्हे भारतीय छत्रपती शिव रायांची कुठल्याही प्रकारची बदनामी सहन करूच शकणार नाही. आणि ज्या लोकशाही ची बात हे इंग्रजी वृत्तापात्रावले करत आहेत त्याच लोकशाहीचे एक कर्तव्य म्हणजे आमच्या स्वाभिमानाची आमच्या महा पुरुषांची चाललेली बदनामी रोखणे. या पुस्तकावरील बंदी साठी कायदा देखील करावा लागला तरी हरकत नाही, पण सडक्या मेंदूतून निघालेले विषारी विचार वेळीच रोखले नाही तर याच लोकशाही मध्ये अराजकता माजेल.
  तुम्ही घेतलेल्या या निर्णयाचा सबंध मराठी माणूस स्वागतच करील, पण हि आशी विषवल्ली परत कधी या महाराष्ट्रामध्ये उगवू नये याची हि काळजी आपण घ्याल अशी अपेक्षा मी करतो.

  अमोल सुरोशे (नांदापूरकर)

 3. pbpimpale says:

  हे अगदी बरोबर केलत. कारण हे ‘काही’ मिडीयावाले हव ते करतात आणि भाषण स्वातंत्र्याच्या नावाने नको त्या गोष्टीना पाठींबा देतात. यातल्या काही वाचाळांना हे नेमका काय चालाय हे माहित नसतांनाही हे टिप्पणी करतात.
  ज्या महापुरुषाने स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची बीज या महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या राष्ट्रात पेरली त्याच्या बद्दल या लोकांनी दोन शब्द तरी वाचलेत का ? आणि स्वतःला हे so called intellectuals म्हणून घेतात.
  यांना शिवरायांच वैश्विक रूपच कळत नाही, कारण परदेशी गोष्टींची आणि विचारांची इतकी लाली चढली आहे कि स्वदेश आणि स्वराष्ट्र याचा अभिमान आणि आदरच उरला नाही. कालच कांचन गुप्ता नावाचे पायोनियर चे एक संपादक आहेत त्यांच्याशी या विषयावर बोलतांना कळले इतक्या जबाबदार पदावरच्या माणसाला ही हा विषय गांभीर्याने घेता येत नाही.
  असो अशा लोकांना इंदाराजींचे हे वाक्य नक्कीच सांगायला हवे,

  “I think Shivaji ranks among the greatest men of the world. Since we were a slave country, our great men have been somewhat played down in world history. Had the same person been born in a European country, he would have been praised to the skies and known everywhere. It would have been said that he had illumined the world.”
  – Indira Gandhi

 4. samratkak says:

  AABA MAHARASHTRACHYA JANATECHA TUMHALA 100% PATHINBA AAHE TYAMULE TUMHI KAHI CHINTA KARU NAKA! SHIVAJI MAHARAJANVISHAYI KUNI UPSHABD KADHALYAS TYALA DHADA SHIKAVANYAS MARATHE KASHI KAMI PADANAR NAHIT .
  JAI SHIVAJI JAI BHAVANI

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s