Category Archives: Post In Marathi

संकल्प नव्या वर्षाचा…. ‘समृद्ध-सुरक्षित’ महाराष्ट्राचा

नमस्कार, आज, १ जानेवारी… नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे जावो या  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी प्रारंभीच आपल्याला देतो. राज्यातील जनतेला निर्भय वातावरणात जगता यावं, यासाठी आम्ही नेहमीच दक्ष राहिलो आहे. यापुढच्या काळात  महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांची … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा……

नमस्कार,   आज आंतरराष्ट्रीय महिला दिन…   महिला दिनानिमित्त मी सर्व माता-भगिनींना शुभेच्छा देतो. प्रत्येक भारतीय महिलेचा आजपर्यंतचा प्रवास हा उल्लेखनीय आहे.   थोडंसं मागे जाऊन आपण इतिहासात डोकावलं तर आपल्याला दिसतं की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय स्त्रीला शिक्षण, भाषण स्वातंत्र्य … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ………

नमस्‍कार! हे महाराष्‍ट्राचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आहे.  महाराष्‍ट्राला सुवर्णभूमी बनविण्‍यात ज्‍या थोर संतांचे, महात्‍म्‍यांचे, सुधारकांचे, क्रांतीकारकांचे योगदान लाभले त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करुन महाराष्‍ट्राच्‍या सार्वजनिक लोकजीवनामध्‍ये लौकीक अर्थाने भौतिक सुख-समृध्‍दी आणि अलौकीक अर्थाने वैचारिक व बौध्दिक समृध्‍दी नांदावी आणि महाराष्‍ट्र ही … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

शुभ दीपावली…..

नमस्कार, दीपावली निमित्त आपणा सर्वांस माझ्या मन:पूर्वक शुभेछ्या, हीं दीपावली तुम्हास आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबास सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो, तिमिरातून तेजाकडे नेणारी जावो…….. आपणा सर्वांना माझे प्रेम , जय महाराष्‍ट्र! आर. आर. पाटील, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य  

Posted in Post In Marathi | Leave a comment

त्‍यांना गोळी नकोय, त्‍यांना हवी भाकरी आणि चांगले प्रशासन…..

नमस्‍कार, राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये झालेल्‍या चर्चेची गोपनिय माहिती अधिकृतपणे केलेल्‍या पत्रकार बैठकीपेक्षा सगळीकडेच अत्‍यंत चांगली छापून आली. ज्‍यांनी ही माहिती वृत्तपत्रांना दिली, त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील नैतिकतेचा व संकेतांचा भंग तर केला आहेच, तसेच राजभवनावर घेतलेल्या गुप्ततेच्या शपथेचीही चेष्टा केली आहे. … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

आग्रहाचे आवाहन….

नमस्कार, २४ सप्टेंबर २०१० रोजी अयोध्येतील वादग्रस्त प्रकरणाचा निकाल न्यायालय देणार आहे. लोकांनी या प्रसंगी कुठल्याही संभाव्य चिथावणीच्या अथवा कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊ नये आणि शांतता, कायदा आणि सुव्यवस्था पाळावी असे आवाहन महाराष्ट्राचा गृहमंत्री या नात्याने मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला या निमित्ताने करतो आहे. … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

‘नटरंग’ चे अभिनंदन….

प्रिय ‘नटरंग’ कलावंत, सप्रेम नमस्‍कार आणि `नटरंग’`च्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील सन्‍मानाबद्दल आपल्‍या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन ! अस्‍सल मराठी मातीतून निर्माण झालेली ही मराठमोळी कलाकृती आज देशभरात दाद मिळविते आहे. महाराष्‍ट्राला अभिमान वाटेल आणि येणा-या कलावंतांच्‍या अनेक पिढ्या हे यश मनात साठवून ठेवतील अशीच ही … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

गणेश चतुर्थी आणि ईद च्या मन:पूर्वक आणि हार्दिक शुभेछ्या….

नमस्कार, गणेश चतुर्थीच्या महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील भारतातील तसेच जगातील सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून मन:पूर्वक आणि हार्दिक शुभेछ्या. हा मंगलमय सण आपल्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि मन:शांती घेऊन येवो. गणरायाचे आशीर्वाद संपूर्ण राज्याच्या पाठीशी कायम राहोत अश्या शुभेछ्या या मंगलक्षणी मी व्यक्त करतो. हा सण … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

स्‍त्री-भ्रृणहत्या थांबवा. नाहीतर….

नमस्कार, आताच न जाणवणा-या पण भविष्‍यात अनर्थ निर्माण करुन एक मोठे सामाजिक संकट ठरणा-या एका प्रश्‍नावर मी आज माझे मत मांडू इच्छितो. तो गंभीर प्रश्‍न म्‍हणजे स्‍त्री-भ्रृणहत्‍या. दिवसेंदिवस स्‍त्री-भ्रृणहत्‍या करण्‍याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: उच्‍च शिक्षित, सधन वर्गामध्‍ये हा विषय … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…

स्वातंत्र्यदिनाच्या आपणा  सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना माझे विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारताने अभिमानास्पद प्रगती केली आहे पण तरी ही प्रचंड मोठ्या समस्या आपणा सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत, उदा. स्त्री-पुरुष समानता खरया अर्थाने आपण अजून ही  आणू … Continue reading

Posted in Post In Marathi | Leave a comment